Tuesday, 18 February 2014


            आज पहाटे अचानक जाग आली. मोबाइल मध्ये किती वाजले हे पहाण्यासाठी डोळे उघडले तर सकाळचे 6.00 वाजले होते....वाटल्ं ,,अरे वा !!! एवढ्या लवकर जाग आली म्हंटल्यावर बाहेर मस्त पक्ष्यांचा किलबिलाट चालू असेल, मस्त प्रसन्न वातावरण असेल खोलीबाहेर, म्हणून मी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी कान टवकारले ...आणि......
   
धूम सिनेमातल्या गाण्याचा सुर असणार्‍या कर्णकर्कश हॉर्न चा आवाज माझ्या कानात घुसला. त्या पाठोपाठ हॉर्न ,गाड्यांची इंजिन आवाज,अन माणसांचा गोंगाट या सगळ्याला त्रस्त होऊन कसली ती प्रसन्न पहाट पहाण्यासाठी बाल्कनी मध्ये उभा राहयलो. खाली पहिलं आणि आता माझ्या लक्षात आले की आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पिकनिक ला आलो नसून प्रचंड मोठ्या शहरामधे, प्रचंड मोठ्या इमारतीमधे 5 व्या मजल्यावर आहोत. इथे प्रसन्न पहाट असण्याची कल्पना करणे म्हणजे वळवंटात समुद्र शोधण्यासारख आहे. इथल्या रस्त्यावरची वाहनांची वर्दळ मध्यरात्री पण शमत नाही.
इथे प्रत्येकाच्या घराचे (माफ करा , फ्लॅट चे म्हणायला हवे कारण इथे घर नाहीच. माझ्या लेखी घराची व्याख्या वेगळी आहे) दरवाजे आतून बंद, कोणी कुणाच्या घरी जायचं नाही आणि फुकटची आपुलकी नाही. इथल्या लोकांना एकमेकांची दू:खच काय पण सुखंही वाटून घ्यायची नाहीत .
 इथल्या नद्यांचे नाले झाले आहेत ... नदीकिनारा आणि घाटाची कचरा कुंडी ,,,,,इथे कुणालाच कुणासाठी वेळ नाही...
   
मग आठवतो आपला गाव. पहाटेच अंगण झाडल्यानंतर रात्री झोपेपर्यंत सताड उघडे असलेले इथल्या घरांचे दरवाजे,जे कधीही येणार्‍या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी तयार असतात.इथल्या घरांना बेल (घंटी) ची गरज नाही.गावातून जाणार्‍या नदीत दिवसभर डुंबण्याची मज्जा काय असते हे माझ्या गावातल्या मित्रांना सांगण्याची गरजच नाही.इथल्या पारावार चाललेल्या वयस्कर लोकांच्या मैफिली,दिवसभर राजकारणावर चालणार्‍या त्यांच्या गप्पा म्हणजे न संपणारा समुद्र असतो. इथल्या लोकांची एकमेकांबद्दलची आपुलकी पाहून उर भरून येतो. इथल्या माळावरचे पोरांचे डाव म्हणजे दिवसभराची करमणूक.
इथे रात्री लाईटची झगमग नसली,दुकानांची वर्दळ नसली,मोठ्या इमारती नसल्या तरी मन:शांतीसुखाची झोप आणि एकमेकाबद्दल प्रेम आहेआभाळएवढे मोठे प्रत्येकच मन आहे.

मग कधी कधी आठवतात ती माणसं ज्यांना गावी आल्यानंतर गावाच्या पाण्याने सर्दी होते. अशा लोकांची मला कीव वाटते.शहरातल्या नदीरूपी नाल्यातून आलेल्या व 100 वेळा जलशुद्धीकरण प्रक्रिया करून मग यांच्या घरातल्या (माफ करा फ्लॅट )water purifier मधून शुद्ध(??) झालेलं पाणी पितात आणि यांचा असा समज होतो की या पाण्याने यांचं जीवन निरोगी झाले आहे आणि पुढेही राहील. यांना गावातल्या धुळीचा त्रास होतो. मात्र शहरातल्या लाखो वाहनाच्या धूरांमुळे यांच्या छातीत झळंबट झाली तरी यांना पत्ता नसतो. यांना मोकळ्या घरांपेक्षा बंद फ्लॅट च कौतुक जास्त असते.हे लोक जेंव्हा गाव खेड्यात येतात तेंव्हा यांना गावात सगळीकडे गैरसोयी दिसतात. एवढं सगळं असूनही या लोकांना आपल ऐश्वर्य( अस त्यांना वाटते ) दाखवायला गावच कस सापडत कुणास ठाऊक...

5 comments: